बळीराजाची चिंता वाढली!  कोकण, विदर्भासह
बळीराजाची चिंता वाढली! कोकण, विदर्भासह "या" भागात जोरदार पावसाची शक्यता
img
Dipali Ghadwaje
देशासह राज्याच्या हवामानातही पुन्हा बदल झाला आहे. पुढील 24 तास राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट आल्याने बळीराजा मात्र चिंतेत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठावाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी जोरदार पाऊस झाला आहे, यामुळे तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात बहुतेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावारण पाहायला मिळणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकणातही पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलके ते मध्यम धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून काही भागात ठिकाणी दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. 9 जानेवारी रोजी संपूर्ण उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशात थंडीचा कहर सुरूच आहे.  रविवारी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही.


 


 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group