भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा , ७२ तास धोक्याचे, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे थंडीचा कडाका
भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा , ७२ तास धोक्याचे, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे थंडीचा कडाका
img
वैष्णवी सांगळे
७२ तास धोक्याचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशात कुठे थंडीचा कडक पहायला मिळतोय तर दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे. उर्वरित राज्यात देखील थंडी वाढल्याचे दिसून येत आहे.  उत्तर भारतात थंडी वाढत आहे. त्यामुळे राज्यात शीत लहरी वाढल्या आहेत. यासोबतच वायू प्रदूषण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. देशात काही ठिकाणी कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. 

नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठला. तालुक्यातील रुई येथे 4.07 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. थंडीचा शेती पिकांवर परिणाम होत आहे. द्राक्षासाठी अपायकारक तर गहू हरवण्यासाठी पोषक थंडी.बीड, परभणी, धुळे, निफाड येथे पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

धुळे येथे 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली. परभणी 6 अंश सेल्सिअस तापमान होते. गोदिंया, नाशिक, मालेगाव, जळगाव पुणे, नागपूर येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईमध्येही सकाळच्या वेळी थंडी जाणवत आहे. 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ७२ तासांत अनेक भागांमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी पावसासोबत हिमवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. 21 डिसेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर, मुझफ्फराबाद, लडाख येथे मुसळधार पाऊस होऊ शकतो. 22 डिसेंबर दरम्यान पंजाबच्या काही भागांमध्येही पाऊस पडू शकतो. तरआंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमधील काही भागात सध्या पाऊस आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा दिला आहे. पंजाब, उत्तराखंड आणि बिहारमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group