राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार
राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार
img
Dipali Ghadwaje
राज्यातील अनेक भागांना काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यातील काही भागात काल रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत पावसांच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

मुंबई, रायगड, जालना, संभाजीनगरमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील ३ ते ४ तास नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.  
 
हवामाने विभागाने मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच याबरोबर सोमवारपासून २५ सप्टेंबर भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

जोरदार पावसामुळे  शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच अनेक मार्ग जलमग्न होऊन वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेत अद्याप या मुसळधार पावसामुळे कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group