कौतुकास्पद ! आजारी शेतकऱ्याच्या मदतीसाठी गाव एकवटलं, घेतला 'हा' मोठा निर्णय
कौतुकास्पद ! आजारी शेतकऱ्याच्या मदतीसाठी गाव एकवटलं, घेतला 'हा' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
सध्या भात शेतीच्या लागवडीचे काम ठिकठिकाणी जोरदार सुरू आहे. पेरणी केलेल्या पिकाची उगवण प्रमाणात झाल्यामुळे भात लावणीला सध्या जोर आले असल्याचे खाडीपट्टयामध्ये पाहायला मिळत आहे. खाडीपट्टयातील खुटील रामवाडी येथील ग्रामस्थ गणपत सुकूम हे आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. आजारी असल्याकारणाने शेतकरी गणपत सुकूम यांची भात शेती लावणी करून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सर्वांनी एकत्र येत मदतीचा हात पुढे केला आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीचा प्रत्यय याठिकाणी आला आहे. 

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
संघटित राहून एकमेकाला सहकार्य करणे आपल्या वाडवडिलांनी दिलेला रूढीपरंपरेचा वारसा आहे तो वारसा तेथील तरुण ग्रामस्थांसह महिला मंडळाने पुढे चालवून एकमेकांच्या मदतीला धावण्यासाठी एकीने पुढे सरसावून महिला, पुरुष एकत्र येऊन भात लावणीच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन गणपत सुकूम यांच्यावर आजारपणामुळे कोसळलेल्या दुःखामध्ये त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. ग्रामस्थ सुकूम आजारी पडल्यानंतर ऍडमिट झाल्यावर त्यांच्या शेतीचे कसे होणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहताच सार्‍या ग्रामस्थांनी त्यांना काही काळजी करू नका आम्ही सर्व एकत्र येऊन तुमच्या भात शेतीची लागवड करू असा शब्द दिलाने अखेर एका दिवसामध्ये सारे ग्रामस्थ एक वटून एकीच्या बाळाने भात लावणी पूर्ण केली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या एकीचे चित्र समोर येऊन त्यांच्या या आदर्शाचे कौतुक सर्वत्र होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
rain | Raigad |
इतर बातम्या
Join Whatsapp Group