ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या कारवर हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या कारवर हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
img
Dipali Ghadwaje
शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान नवगणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय चालक देखील जखमी झाला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुरुवारी (ता. २) महाड येथे जाहीर सभा होती. या सभेला अनिल नवगणे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते. सभा संपल्यानंतर ते इंदापूर येथील आपल्या घरी कारने परतत होते.

त्यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान नवगणे यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी अचानक लाठ्या-काठ्या घेऊन कारवर हल्ला चढवला. यावेळी कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली. त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले. या हल्ल्यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय चालकाला देखील दुखापत झाली आहे.  या  घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group