धक्कादायक!
धक्कादायक! ".....म्हणून आजीने नातवासोबत टेरेसवरून उडी मारली", कुठे घडली घटना ?
img
Dipali Ghadwaje
आजारपणाला कंटाळून आजीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात आज सकाळी आजीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार , रोहा-कोलाड रस्त्यावरील ओम चेंबर बिल्डिंगच्या टेरेसवरून ५२ वर्षीय आजी उर्मिला कोरे यांनी त्यांच्या नातवासह उडी मारली. आजी-नातवाच्या मृत्यूच्या या घटनेमुळे रोहा परिसरात शोककळा पसरली आहे.


या घटनेत उर्मिला कोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचा नातू गंभीर जखमी झाला. जखमी नातवाला तातडीने पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने रस्त्यातच मृत्यू झाला. नातवाचे नाव वेदांत विवेक बोगडे असे असल्याचे समजतेय.

उर्मिला कोरे यांनी नातवाच्या दीर्घ आजारपणाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टोकाचे पाऊल का उचलले? त्याचं नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.  घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, उर्मिला कोरे या गेल्या काही दिवसांपासून तणावग्रस्त दिसत होत्या. त्यांचा नातू गंभीर आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या उपचारांसाठी त्या सातत्याने धडपडत होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.  
Raigad | roha |
इतर बातम्या
Join Whatsapp Group