सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात जोरदार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जोन जिल्ह्यांमा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.