हवामान तज्ज्ञांचा मोठा इशारा! मे अखेरीस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार ; महाराष्ट्रसह
हवामान तज्ज्ञांचा मोठा इशारा! मे अखेरीस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार ; महाराष्ट्रसह "या" राज्यांना फटका बसण्याची शक्यता
img
Dipali Ghadwaje
बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळामुळे 23 ते 27 मे दरम्यान ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई नॉकास्टने दिली आहे. यामुळे 28 मे 2024 च्या आसपास गुजरात आणि मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

सध्या, हे चक्रीवादळ तीव्र होत आहे आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशाच्या अनेक भांगांवर त्याचा परिणाम होणार आहे. भारतीय हवामान खात्याने मात्र अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

दरम्यान, हवामान विभागाने 23 मे पर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

"पुढील 7 दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे," असे IMD ने आपल्या नव्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. 

तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये 23 मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group