राज्यात  पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट, वाचा कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
राज्यात पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट, वाचा कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
img
Dipali Ghadwaje
राज्यात पाऊस कधी पडणार असा प्रश्न सर्वजण विचारत होते. दरम्यान, आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह काल पाऊस पडला. राज्यात आजही पावसाचे वातावरण आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आज राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे. आज राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या भागात जोरदार वारा येण्याची शक्यता आहे.
 
गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

पालघर, रायगड, पुणे, सातारा या ठिकाणी पावसाची नोंद सुरु आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे तापमानातदेखील चढ उतार होणार आहेत.

कोकण विभागात यलो अलर्ट

पालघर आणि मुंबई सोडून कोकण विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये मंगळवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यातदेखील पुढचे चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातदेखील मेघगर्जनेसह वाऱ्यांची शक्यता आहे. हे वारे ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान , आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे  नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group