मे महिन्यापासूनच राज्यातील वातावरणात कमालीचे बदल बघायला मिळाले. दरम्यान काही दिवसांपासून या घमासान पावसाने विश्रांती घेतलीमाह्ये . परंतु आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना 3 जून रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच इतरही काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 3 जूनसाठी पावसाचा यलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
3 जून रोजी मुंबईतील तापमान 26 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी यासर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यातील तापमान 22 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. त्याठिकाणी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी नगरमधील तापमान 3 जूनला 24 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. त्याठिकाणी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छ्त्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. नाशिकमधील तापमान 23 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. त्याठिकाणी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
नागपूरमधील तापमान 27 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.