महत्वाची बातमी : महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस जोरदार पाऊस कोसळणार
महत्वाची बातमी : महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस जोरदार पाऊस कोसळणार
img
Dipali Ghadwaje
मुंबई शहर आणि उपनगराला जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे. सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  

कालपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढचे आणखी चार दिवस जोरदार पाऊस असणार आहे, मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या भागात ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

रेल्वेवरही परिणाम

महाराष्ट्रातील कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत, काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे प्रवासाचे मार्ग लहान करण्यात आले आहेत.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group