सावधान! पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
सावधान! पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
img
DB
राज्यातील वातावरणात चांगलाच बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार  पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून पावसाचा जोर दिसणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group