वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे
वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे "या" ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या बाजूचं लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. 

रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडलं नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे, की अनधिकृत हे समजू शकल नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात रस्त्यालगत असलेलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं. होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालं आहे. नुकतंच, मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांना मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर होर्डिंगचा विषय समोर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे.
rain | pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group