२४ एप्रिल २०२६
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अनेक ठिकानी गारपीटीसह वदळी वारे व अवकाळी पाऊस पडल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट घोंघावत आहे. विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी 30 ते 50 तास किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुख्यत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागांत पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर विदर्भात उष्णता कायम राहील आणि काही ठिकाणी उष्णतेची लाट असेल. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे. त्यातच वादळी पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. पालघर वगळता मुंबई ते सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणात ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अलर्ट आहे. कमाल तापमान 32-38 अशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात देखील 48 तास महत्त्वाचे असणार आहेत. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहून विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषत: 23 आणि 24 एप्रिलला गारपीटचा इशारा देण्यात आला असून कमाल तापमान 35-40 अंशांपर्यंत राहील.. मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत देखील तुरळक पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज गारपिटीचा देखील धोका आहे. कमाल तापमान 36-42 अंशांच्या दरम्यान राहणार असून काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल. विदर्भात अवकाळी संकट नसलं तरी होरपळून काढणारी उष्णता जाणवेल. अकोला आणि वर्धा जिल्ह्यांत पारा 45 पार गेला असून आज या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
तर हवामान कोरडे राहील. कमाल तापमान 40-45 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल जाणवतील. धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये उष्णतेचा पारा चढला असून हवामान कोरडे राहील. तर नाशिक, अहिल्यानगर परिसरात वादळी पावसाचा धोका आहे.
कमाल तापमान 36-40 अंशांच्या दरम्यान राहील.. एकंदरीत, महाराष्ट्रासाठी 48 तास महत्त्वाचे असणार आहेत. वादळी वारा, विजा आणि गारपिटीमुळे धोका असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच उष्णतेचा पारा चढला असून काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
Copyright ©2026 Bhramar