परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग  !  ''या'' २४ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग ! ''या'' २४ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा कमबॅक केला असून राज्यात परतीचा मान्सून सक्रीय झाला असून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील २४ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण परतीच्या पाऊस चांगला पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group