यंदा देशात एल निनोच्या संकटाने संपूर्ण देशात पावसाचा अभाव जवळ असून त्याचा परिणाम म्हणजे आता शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक जिल्ह्यात तर दुष्काळसदृश्य परिस्तिथी निर्माण झालेली आहे. याचदरम्यान आता तज्ज्ञांनी एल-निनोच्या संकटाबाबत भाकीत केलं आहे.
देशात एल- निनोचे संकट शेतीला मोठा फटका देणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाचे हवामान शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारे ठरणार आहे. एल-निनोने रब्बी पिकांची चिंता वाढविली आहे. जेथे सिंचनाच्या ऐवजी पावसाच्या भरोसे शेती होते तेथे रब्बी सिझन अडचणी तयार करु शकतो असे कृषी सचिव अतिश चंद्र यांनी म्हटले आहे. जर पावसाची गणित बिघडले तर गहू, राई, डाळ आणि तिळाचे उत्पादनावर परिणाम होणार असल्याने खाद्य तेलावर देखील संकट येऊ शकते.
कृषी सचिव म्हणाले की रब्बी सिझनमध्ये पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पाऊसच आला नाही तर पिके अडचणीत येतील.
शेतकऱ्यांसाठी धोका केवळ कोरड्या दुष्काळाचा नाही तर कृषी सचिवांनी सांगितले काही राज्याच्या मातीत आवश्यकतेपेक्षा जास्त आद्रतेची समस्या येऊ शकते. तर कमी पावसाच्या भागातील पिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्याच कारणामुळे यंदा रब्बी सिझनची तयारी सामान्य प्रकारे झालेली नाही. वेग-वेगळ्या भागात हवामान आणि पाण्याची स्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल.
638 लाख हेक्टरवर रब्बी पिके
देशात रब्बीचे पिके सुमारे ६३८ लाख हेक्टर जमीनीवर घेतली जातात. यात गव्हाची शेती ३०० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात घेतली जाते. सुमारे १४० लाख हेक्टरमध्ये डाळी, ८७ लाख हेक्टरमध्ये तिळ आणि ५५ लाख हेक्टरमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांची शेती होते. म्हणजे हवामानाने दगाफटका दाखवला तर याचा परिणाम केवळ एकाच पिकांवर होणार नाही.
खरीपनंतर आता रब्बी पिकांची बारी
यंदा खरीप सिझन देखील सोपा नव्हता. अनेक राज्यात शेतकऱ्यांना आधी पेरणी पूर्ण करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात अडचणी आल्या आणि नंतर उभ्या पिकाला वाचवणे आव्हानात्मक बनले. आता रब्बी पिकांची वेळ असून एल – निनोने चिंतेत वाढ केली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या भागात जास्त चिंता आहे.
भारत अन्न -धान्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. मात्र डाळी आणि तिळाची गरज पूर्ण करण्यासाठी आयात करावी लागेल. जर रब्बी उत्पादन घटले तर पुढे गहु, डाळी, खाद्य तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.