सावधान! महाराष्ट्र पुन्हा 'हॉट'; विदर्भात उष्णतेची लाट, तर 'या' ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!
सावधान! महाराष्ट्र पुन्हा 'हॉट'; विदर्भात उष्णतेची लाट, तर 'या' ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!
img
नितीशा कुलकर्णी








सध्या उष्षतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. काही ठिकानी तर उष्माघाने मृत्यू झाल्यचे पहायला मिळाले आशातच आता 27 एप्रिलसाठी हवामान विभागाने धोक्याचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात होरपळून काढणारी उष्णतेची लाट येणार असून 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.


विभागानुसार तुमच्या जिल्ह्याच हवामान कसं असेल जाणून घ्या. महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. अवकाळी संकटाचा धोका टाळला असला तरी आता उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


27 एप्रिलसाठी हवामान विभागाने धोक्याचा अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान असेल. मुंबईसह संपूर्ण कोकणात कमाल तापमानाचा पारा 32-35 अंशांवर राहील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील.


मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान 38-42 अंशांपर्यंत जाईल. रात्री देखील 22-26 अंशांपर्यंत तापमान राहणार आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवेल. मराठवाड्यात अवकाळी संकट टळले असून ऊन जाणवेल. हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा पुन्हा चढणार आहे.


कमाल तापमान 39-43 अंशांपर्यंत राहील. तर रात्रीचा पारा 23-27 अंशांपर्यंत राहील. सोमवारपासून पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. उष्णता जास्त राहील.


विदर्भात सोमवारी उष्णतेची लाट येईल. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. सोमवारी पावसाची शक्यता नाही.


मात्र मंगळवारपासून पुन्हा विदर्भात अवकाळी संकट सक्रिय होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहील. कमाल तापमान 39-43 अंशांपर्यंत राहील. उष्णतेचा चटका जाणवेल. पावसाची कोणतीही शक्यता नाही.


एकंदरीत, महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 घराबाहेर जाणे टाळावे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group