उष्णतेचा कहर ! 24 तासात  सूर्य आग ओकणार;  ''या'' जिल्ह्यांना तातडीचा अलर्ट!
उष्णतेचा कहर ! 24 तासात सूर्य आग ओकणार; ''या'' जिल्ह्यांना तातडीचा अलर्ट!
img
Nandini khandare More

आधीच राज्यात उष्णतेने कहर केला असून अजूनही थंडावा मिळण्याचे चिन्ह दिसत नाहीये. उलट हा उकाडा दिवस वाढतच चालला आहे. दरम्यान आता हवामान विभागाकडून अजून एक टेन्शन वाढविणारी अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे. पुढील 24 तासांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळ ठिकाणी रात्री उष्ण राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे....

विशेष म्हणजे हवामानाचा हा अंदाज विदार्भातील लोकांना मोबाईलवरील मेसेजच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अलार्मच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईच्या स्क्रीनवर हा संदेश झळकला आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अचानकपणे सर्वांचे मोबाईल वाजू लागल्याने ही उष्णतेची लाट भयंकर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगितले जात आहे.

उष्णतेची लाट येणार असून लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करणारे मेसेज आल्याने लोकांमध्ये काही काळासाठी भीतीचेही वातावरण निर्माण झाले. परंतु घाबरून न जाता शक्य असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group