पुढचे ८ तास सावधान रहा ! महाराष्ट्रासह ''या'' १३ राज्यांना अलर्ट जारी; वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसणार
पुढचे ८ तास सावधान रहा ! महाराष्ट्रासह ''या'' १३ राज्यांना अलर्ट जारी; वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसणार
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून उसंत  घेतलेला पाऊस आता सक्रिय झाला आहेस. संपूर्ण देशासह अनेक राज्यात आता परतीच्या पावसाने आता धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार , महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये आज पाऊस धुमाकूळ घालणार आहे. हवामान खात्याकडून या १३ राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे १३ राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ७५ किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने केरळ, राजस्थान, झारखंड, ओडिशा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान काही भागांमध्ये ताशी ४० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहणयाची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.


महाराष्ट्रामध्ये  दडी मारलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले होते. पाऊस नसल्यामुळे दुष्काळ आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. पण आता राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहिल. या ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group