वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांकडून 1,676 पानांचं दोषारोपपत्र सादर
वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांकडून 1,676 पानांचं दोषारोपपत्र सादर
img
दैनिक भ्रमर
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण राज्यात चांगलंच चर्चेत राहील आहे. वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ आणि त्यांनतर तिची आत्महत्या. या प्रकरणाने पुन्हा एकदा हुंडाबळीचा प्रश्न धक्कादायकरित्या समोर आला. आता याच वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात आता दोषारोपपत्र सादर झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल 1 हजार 676 पानांचा दोषारोपपत्र तयार केलंय. 
आत्महत्येच्या 59 दिवसांनी हे दोषारोपपत्र बावधन पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. 

वैष्णवीने 16 मे 2025ला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हगवणे कुटुंबातील सासरा राजेंद्र, पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा आणि दिर सुशील यांनी तिला जीव देण्यास भाग पाडले. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा अमानुष छळ केला. असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर हगवणे कुटुंबियांना बेड्या ठोकण्यात आल्या. तर वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाची हेळसांड प्रकरणी निलेश चव्हाण ही अटकेत आहे. त्यानंतर पोलिसांनी 59 दिवसांत 1 हजार 676 पानांच्या दोषारोपपत्र सादर केलं. यात एकूण अकरा आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे. 

यातील सासरा राजेंद्र आणि दिर सुशांतला सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी आसरा देणाऱ्या पाच जणांचा समावेश आहे. त्यांना अटकेनंतर जामीन मिळाला होता, उर्वरित सहा जण येरवडा तुरुंगात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group