पुणे : पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याभरातच पुण्यातील रुग्णसंख्या 101 वर गेली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
पुण्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता आरोग्य विभागाने तयारी अधिक तीव्र केली आहे. त्याचबरोबर रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 बेडसह 15 आयसीयू आरक्षित करण्यात आले आहेत..
गेल्या काही दिवसांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम रूग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. त्याचा सर्वाधिक धोका पुण्याला असून गुइलेन-बॅरे सिंड्रोम सर्वाधिक म्हणजे 101 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात आज एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात पुण्यात वाढले GBS 28 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
रुग्णांच्या बिलावर महापालिकेची नजर
जीबीएसआजरावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. GBS चे पुण्यात 101 रुग्ण आहेत. त्यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 5 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 50 बेड तर 15 आय सी यू कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत . तसेच खाजगी रुग्णालयात GBS चे रुग्ण आहेत.
त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. ( नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय ) या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर ऑफिसर लक्ष ठेवणार आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे