पुण्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार सुरु असल्याची घटना पुण्यातील स्वारगेट भागात घडली. स्वारगेट भागातील २ ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी या आयुर्वेदिक मसाज सेंटरवर धाड टाकत ५ मुलींची सुटका केली. महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली.
पुण्यातील स्वारगेट भागातील २ ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईतून पोलिसांनी ५ मुलींची सुटका करण्यात आली. पहिल्या कारवाईतमध्ये मार्केटयार्ड भागात वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला. त्याठिकाणी ४ महिला काम करत असल्याचे आढळून आले. या महिलांना पोलिसांनी नको त्या अवस्थेत पाहिले. त्या चार ही जणींची सुटका करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईमध्ये मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देखील वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिांनी त्याठिकाणी तोतया व्यक्ती पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली. उच्चभ्रू सोसायटी परिसरामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हे वेश्या व्यवसाय सुरू होते.
या दोन्ही कारवाईत २ महिलांना पोलिसांनी अटक केली. यात पहिल्या कारवाईत छत्रपती संभाजीनगरची रहिवासी असलेल्या एका महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली.तर दुसऱ्या कारवाईत ३८ वर्षीय महिलेला या प्रकरणी अटक केली.