मोक्का कारवाईनंतर पसार झालेल्या सराईताला पकडण्यात पोलिसांना यश
मोक्का कारवाईनंतर पसार झालेल्या सराईताला पकडण्यात पोलिसांना यश
img
Dipali Ghadwaje
पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या सराइताला पोलिसांनी अटक केली. राजकुमार श्यामलाल परदेशी (वय २६, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बालाजीनगर परिसरात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परदेशी आणि साथीदारांवर गेल्या वर्षी सहकारनगर पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. 

मोक्का कारवाईनंतर पसार झाला होता. तो उत्तर प्रदेशात वास्तव्यास होता. परदेशीवर गंभीर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.  पसार झालेला परदेशी हा बालाजीनगरात मित्राला भेटण्यास येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. नंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group