पुणे विमानतळावर एका महिलेच्या बॅगमध्ये पिस्तूल सापडले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला विमानात जाताना हे पिस्तूल घेऊन जात होती. महिलेच्या बॅगेतू फक्त पिस्तूल नव्हे तर जिवंत काडतुसेदेखील सापडली आहेत. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
४४ वर्षीय वैशाली वैभव दोशी ही महिला बॅगेतून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन जात होती. ती "अघोरी विद्येची" पूजा करायची. तिला एका माणसाने ही पिस्तूल दिली होती, असं तिने सांगितले. याप्रकरणी चौकशी केली असता तिला हे पिस्तूल एका शिष्याने दिले होते आणि त्या जंगलात जाऊन पूजा करत असल्याने याची गरज आहे असं तिने पोलिसांना सांगितलं. अधिक चौकशीवेळी असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुणे विमानतळावर ही घटना घडली. वैशाली वैभव दोशी मूळची बारामतीची आहे. ती तंत्र विद्येचा व्यवसाय करते. ती पुण्यावरून इंदौरमार्गे दिल्लीला जात होती.