पुणे : लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षांतर्गत असलेल्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षात आज प्रवेश केला आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित हा शिवसैनिकांचा प्रवेश करून घेण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणावळा शहरप्रमुख प्रकाश पाठारे, दुसरे उपशहर प्रमुख विजय आखाडे, माजी नगरसेवक आणि महिला आघाडी अध्यक्ष कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.