पुणे शहरातून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुणे शहरातील विमाननगर भागात शुभम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. शुभम अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना ती थेट खाली कोसळल्याच्या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे
जिथे एका सोसायटीमधील गाडी पार्किंगमधून थेट खाली कोसळली आहे. घडलेली संपूर्ण घटना सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,संपूर्ण परिसर एका सोसायटीचा दिसत आहे. जिथे सोसायटीमधील अनेक मजली कार पार्किंग परिसर दिसत आहे.
काही वेळाने शांत दिसणाऱ्या या व्हिडिओत पार्किंगमधून एक कार अचानक भिंत फोडून जोरदार खाली कोसळली जाते. कारचा आवाज ऐकून अनेकजण तिथे जमा होतात. सध्या पुणे शहरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.
कारच्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या अपघाताचे कारण रिव्हर्स घेताना अंदाज चुकलाचे सांगण्यात येत आहे.