'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली आणि सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'लपंडाव' या मालिकेत आपल्या अभिनयाची छाप उतरवणारी मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. रुपालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गाडीची वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. या अपघातात रूपाली सुखरूप असली, तरी तिच्या लक्झरी गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, रुपाली भोसलेच्या ज्या गाडीचा अपघात झाला आहे, ती लग्झरी कार अभिनेत्रीनं काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. याबाबत तिनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिली आहे. तसेच, रुपालीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करुन अपघाताची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली भोसलेनं तिची नवी मर्सिडिज बेन्झ गाडी घेतल्याचा आनंद सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केला होता. आता रुपालीच्या त्याच मर्सिडिज बेन्झ कारचा अपघात झाला आहे.
रुपाली भोसले इन्स्टाग्रामच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गाडीचा अपघात झाल्याचे दिसत आहे. तिने व्हिडीओवर "अपघात झाला, वाईट दिवस" असे कॅप्शन लिहिलं आहे. तसेच हार्ट ब्रेकचा इमोजी टाकला आहे. रुपालीने अलिकडेच नवी कोरी मर्सिडीज खरेदी केली होती. गाडीच्या बोनटचे मोठे नुकसान झाले आहे. रुपाली भोसले हिने अपघात विषयी काही सविस्तर माहिती शेअर केली नाही. मात्र गाडी महाग असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.