सीबीएस जवळ पहाटे भीषण अपघात; एक ठार तर चार जण जखमी
सीबीएस जवळ पहाटे भीषण अपघात; एक ठार तर चार जण जखमी
img
दैनिक भ्रमर



सीबीएस जवळ झालेल्या भीषण अपघातात 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सागर सुदाम शिंदे (वय 35 रा.  पिंपळणारे, तालुका दिंडोरी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सागर सुदाम शिंदे, साहिल रघुनाथ कोरणे, कनिष्कनाथ मंगरूळ, सुदाम मुरलीधर सोनवणे तसेच अक्षय अशोक गवते हे पाच जण फॉर्च्युनर कार मधून सीबीएस कडून शालीमारकडे जात होते.

त्यावेळी ही कार डीवाईडरला धडकल्याने कारने तीन ते चार पलट्या घेतल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पलटी घेतल्यानंतर ही कार इलेक्ट्रिक पोलवर जाऊन आढळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीमधील एकाचा जागेवरच मृत्यू झाला.

चौघाही जखमींना नाशिक मधील विविध खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाततावेळी नेमकं काय झालं हे मात्र समजू शकले नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group