पुणे अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर ; अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन
पुणे अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर ; अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन
img
DB
पुणे : पुणे कार अपघातात प्रकरणी पोलिसांनी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे चालक मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी बाल न्याय हक्क मंडळाकडे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याचं उघड झालं आहे.  कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे.

सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे. यात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे. विशाल अग्रवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

तसंच पुण्यात त्यांची मित्रासह भागीदारी होती. मात्र संपत्तीच्या वादातून मित्रावर गोळीबर झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातही छोटा राजनचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group