वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले ; म्हणाले...
वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले ; म्हणाले...
img
Dipali Ghadwaje
वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशिंग यांच्याकडून मांडली जात आहे. वकील दुशिंग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. आता यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

गिरीश महाजन म्हणाले की, अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा विषय आहे आणि अशा पद्धतीने वकिलांनी बोलावं, तिच्या चारित्र्यावर आरोप करावे, यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. काय करावं याला कायद्याच्या चौकटी आहेत आणि मंत्री म्हणून मी बोलू शकत नाही. पण, अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

 गिरीश महाजन पुढे म्हणाले की,  सर्व पुरावे असताना अशा पद्धतीने बचावासाठी अशा प्रकारची वक्तव्य करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे म्हणावे लागले. हे स्टेटमेंट करणाऱ्या वकिलाला देखील थोडीफार लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरामध्ये आई, बहिणी, मुली असतील, असे म्हणत त्यांनी वकील दुशींग यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केलाय. 

नेमकं काय म्हणाले होते वकील दुशिंग? 

हगवणेंचे वकील दुशिंग यांनी आपल्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, असं त्यांनी कोर्टासमोर म्हटले. तसेच, वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने उंदीर मारण्याचं औषध घेतले होते. तर एकदा तिने गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असाही युक्तीवाद दुशिंग यांनी केला आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group