भाजप आमदार सुरेश धस यांनी हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे.
आयजी पोस्टवर असलेला माणूस 1 लाख रुपये रोख घेतो. 50 हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे? असं देखील आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
हगवणे बंधूंना जो शस्त्र परवाना मिळाला होता. त्यावर सुपेकर यांची सही असल्याचं समोर आलंय. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी असून त्यांनी लाच घेतल्याचे देखील आरोप केले जात आहेत. आता भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सुपेकर 100 टक्के फॉल्टी
नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता म्हणजे अर्थ सुपेकर 100 टक्के फॉल्टी आहे. नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नसून किती खालच्या थराला गेले, याचं उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची 150 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. ती प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची? असं देखील सुरेश धस यांनी विचारलं आहे. असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी त्यांच्यावर शेण फेकलं पाहिजे. भविष्यात आष्टी मतदार संघामध्ये हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवट तयार ठेवा, असं आवाहन देखील धस यांनी केलंय.