पुणे : पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट आली असून या प्रकरणात आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने पुण्यात मोठी खळबळ माजली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठे येथे रविवारी रात्री त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे बहिणींचाच हात असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली असून यामध्ये त्यांच्या बहिणी आणि भावोजींचा समावेश आहे.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. यामध्ये वनराच्या सख्ख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
अखेर याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्या सख्खे भावीजो आणि बहिणींची नावं आहेत.