जामिनावर सुटताच
जामिनावर सुटताच "त्या" प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी विशाल अगरवालला ठोकल्या बेड्या
img
Dipali Ghadwaje
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातून जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. अग्रवालवर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याच प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी त्याला येरवडा तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी अटक केली आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे?

बावधन येथील ज्ञानसी ब्रम्हा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला आहे. 2010 साली पजेशन देऊनही विशालने पुढची पूर्तता केलेली नाही. सोसायटीत ठरलेल्या सुविधा, मोकळी जागा, कंव्हिन्स डिड लेटर अद्याप दिलं नाही. तसेच आवारातील रीकन्स्ट्रक्शनसाठी सोसायटीची परवानगी घेतली नाही.  याप्रकरणी सोसायटी आणि विशाल अग्रवाल चे वाद सुरू होते. पोर्शे कार अपघात प्रकरणात त्याचे कारनामे समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी 9 जूनला हा गुन्हा दाखल केला.

पुणे पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या विशालला नुकताच जामीन मंजूर झाला होता. मात्र येरवडा तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच हिंजवडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. 

आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. तसेच, बिल्डर असल्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणीही अग्रवालवर गुन्हा दाखल आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group