समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, सिन्नर तालुक्यातील सोनारी शिवार येथे अपघात , एक ठार
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, सिन्नर तालुक्यातील सोनारी शिवार येथे अपघात , एक ठार
img
वैष्णवी सांगळे
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील सोनारी शिवार (चॅनल क्र. 578) येथे मंगळवारी (दि. 30 डिसेंबर ) पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एमजी हेक्टर कारने पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत कारमधील तरुणाचा मृत्यू झालाय, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

व्यापारी बँकेचे संचालक निवडणुकीच्या रिंगणात; तीन संचालक आमनेसामने

या अपघातात सूरज भागचंद मांडवले (वय 30, रा. रामनगरी, मालेगाव कॅम्प) याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. आणि कुटुंबावर मोठा दुःखांचा डोंगर कोसळला. मुंबईकडून सिन्नरच्या दिशेने येणारी एमजी हेक्टर कार (क्र. 41 5959) पुढे जाणार्‍या वाहनाला धडकल्याने ही दुर्घटना घडली.

अपघातात कारमधील सूरज मांडवले, अजय लिंबा अहिरे आणि संग्राम सावंत हे तिघेही जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सूरज मांडवले यांची प्राणज्योत मालवली. अजय अहिरे व संग्राम सावंत यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group