वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात चर्चेत आलेल्या IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून, सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सुपेकर यांना दणका देत त्यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

पत्रिकेत मुलाचे मामा म्हणून सुपेकरांचे नाव
काहीवेळापूर्वी वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पत्रकार परिषदेत मुलाच्या जन्मपत्रिकेत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे नाव आहे, असेही सांगितले होते.
त्यानंतर, काही वेळातच सुपेकरांकडून कार्यभार काढून घेण्यात आला आहे. जालिंदर सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र, आता हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलाय.