धक्कादायक ! आयटी इंजिनिअरच्या कारवर 40 जणांचा हल्ला, काय आहे प्रकरण ? पाहा  व्हिडीओ
धक्कादायक ! आयटी इंजिनिअरच्या कारवर 40 जणांचा हल्ला, काय आहे प्रकरण ? पाहा व्हिडीओ
img
दैनिक भ्रमर
आजकाल सर्रासपणे गुंडागर्दीच्या घटना पाहायला आणि ऐकायला मिळत असतात. कोणत्याही प्रकारचा धाक न बाळगता लोकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आह.   दरम्यान ,पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  कुटुंबासह प्रवास करणाऱ्या एका आयटी  इंजिनिअरच्या  कारवर जवळपास 40 जणाच्या जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयटी इंजिनिअर असलेले रवी करनानी हे आपल्या कुटुंबासह कारमधून प्रवास करत असताना लवाळे-नांदे मार्गावर 29 सप्टेंबर ही घटना घडली.  करनानी हे सूसगाव येथील निवासी आहेत. दोन बाईकस्वार आणि एका कारने त्यांच्या कारचा पाठलाग करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. करनानी यांनी कार थांबवण्यास नकार दिल्यानंतर बाईकस्वारांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यानंतर काही जणांनी लाठी, लोखंडी रॉड, दगडांसह करनानी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

 रवी करनानी यांनी आपल्यावरील हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे या व्हिडीओत कारचे हल्ल्यात झालेले नुकसान, हल्ला करणारा जमाव दिसत आहे. या जमावाने करनानी यांना त्यांची कार थांबवण्यासाठी पाठलाग केला. यावेळी त्यांचे वाहन भरधाव वेगात होते. करनानी यांनी सांगितले की, एका स्थानिक टोळीने हा हल्ला केला, स्थानिक नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात येते असे त्यांनी सांगितले.


 तसेच, या हल्ल्याबाबत पोलिसांनीदेखील कोणतीही मदत केली नसल्याचे करनानी यांनी सांगितले. पेट्रो लिंग करणाऱ्या स्थानिक पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. इतकंच नाहीतर त्यांनी हल्लेखोरांची बाजू घेतली असल्याचे करनानी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पौड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group