पुण्यातील सिंहगडरोड परिसरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. गे डेटिंग अॅपवर ओळख करून तरूणांना जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार , अश्लील व्हिडिओ काढून आरोपी पीडित व्यक्तींना धमकी द्यायचे. नंतर कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत लुटायचे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पुण्यातील सिंहरोड परिसरातील गे डेटिंग ॲपचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गे डेटिंग ॲपवरून आरोपी आधी तरूणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. नंतर आरोपी पीडित व्यक्तींना भेटण्यासाठी बोलवायचे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित व्यक्तीला बोलावून घेतलं.
नंतर कारमध्ये नेलं. आरोपीने पीडित व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ शूट केला. तसेच काही वेळानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. '१० हजार दे नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेन', अशी धमकी दिली.
पीडितेनं रक्कम देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी तरूणाचा फोन हिसकावून घेतला. तसेच ऑनलाईन पद्धतीने रक्कम ट्रान्सफर करून घेतली. नांदेडसिटी पोलिसांनी तक्रारीवरून कारवाईला सुरूवात केली.
या प्रकरणी पोलिसांनी रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. त्याचा साथीदार ओंकार मंडलिक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.