माणुसकीला काळीमा फासणारी घटना! नवऱ्याने बायकोचा कात्रीने चिरला गळा : मुलासमोर धक्कादायक कृत्य
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! नवऱ्याने बायकोचा कात्रीने चिरला गळा : मुलासमोर धक्कादायक कृत्य
img
Dipali Ghadwaje
पुण्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवऱ्याने कात्रीने गळा चिरून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने आपल्या मुलासमोरच हे धक्कादायक कृत्य केले आहे. पुण्यातील खराडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पतीने पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नीला संपवले.mपत्नीचा हत्या करून पती पोलिस ठाण्यात हजर झाला. खराडी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्योती शिवदास गीते असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. चंदन नगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे.

ही घटना शिवदास गीते यांच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. खराडी परिसरात तो भाड्याने राहतो. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती. शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.

'माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल.', असा त्याला संशय होता. या संशयात त्याने ज्योतीची हत्या केली. पुढील तपास  पोलिस  करत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group