बदलण्यात आलेले  ते रक्ताचे नमुने नक्की कोणाचे? फॉरेन्सिक अहवालातून  समोर आली
बदलण्यात आलेले ते रक्ताचे नमुने नक्की कोणाचे? फॉरेन्सिक अहवालातून समोर आली "ही" धक्कादायक माहिती
img
Dipali Ghadwaje
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अपघाताला जबाबदार अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये ससून रुग्णालयात फेरफार करण्यात आले होते. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक करण्यात आल्यानंतर तिने रक्ताचे नमुने आपलेच असल्याची कबुली दिली होती. आता फॉरेन्सिक विभागाकडूनही त्याला पुष्टी देण्यात आली असून अहवालात रक्ताचे नमुने शिवानी अग्रवाल यांचेचं असल्याचं म्हटलं आहे.

शिवानी अग्रवालला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मास्टरप्लान आखला होता. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून त्या पुणे पोलिसांना गुंगारा देत होत्या. शिवानी अग्रवाल सुरुवातीला लुधियाना त्यानंतर मुंबईमध्ये आल्या होत्या. शिवानी अग्रवाल इतर नंबरवरून काही जणांच्या संपर्कात होत्या. मोबाईल लोकेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी अखेर शिवानी अग्रवालला अटक केली होती.

त्यानंतर ससूनमध्ये बदलण्यात आलेले रक्ताचे नमुने बदलल्याची कबुली त्यांनी दिली होती. आज त्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक लँबला पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक विभागाकडून त्याचा आज अहवाल आला. या अहवालात रक्ताचे नमुने शिवानी अग्रवाल यांचेच असल्याचं म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group