बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला अन् एकच खळबळ उडाली ; नेमकं काय प्रकरण? वाचा
बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला अन् एकच खळबळ उडाली ; नेमकं काय प्रकरण? वाचा
img
Dipali Ghadwaje
पुण्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे शहर पोलिसांना रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांची यंत्रणा तात्काळ कामाला लागली. फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोक  त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. दारूच्या नशेत त्यानं फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ,  पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. सकाळी 9 वाजता पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आल्याचा समोर आले.

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत त्याला ताब्यात घेतलेय. फोन करणार व्यक्ती वय 40 पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याची माहिती.

या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदरील व्यक्तीने दारूच्या नशेत खोडसाळपणे फोन केल्याचं तपासात उघड झालेय.

आपल्याकडे लोकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कॉल केल्याचं पोलिसांच्या तपासात त्या व्यक्तीने सांगितले. पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group