करुणा मुंडेंकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे?  सुरेश धस यांनी केलं स्पष्ट ,  काय म्हणाले ?
करुणा मुंडेंकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट , काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंढे यांच्यावर  विरोधकांकडून टीका केली जात आहे. तसेच मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी देखील संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरले आहे. तसेच या प्रकरणात आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय आता करुणा मुंडे यांनी देखील राजीनामाची मागणी केली आहे असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. 

संतोष देशमुख प्रकरणात आकाच्या आकाच्या राजीनाम्याची आमची मागणी कायम आहे. आता करुणा मुंडे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे, हे त्यांनाच विचारावं लागेल. आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देतो. ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्यासोबत नाही. आता परळीतील ५०० व्यापारी आणि लोकांनी गाव सोडलं आहे. तिथं अनेक माफिया, राख माफिया, वाळू माफिया आहेत. आकाच्या आकाची पिलावळ आहे, त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय त्या बोलणं योग्य होणार नाही,अन्यथा तपास स्पॉईल होईल, यासाठी आपण धनंजय देशमुखला समजावणार आहोत. 

तसेच ,  कृष्णा आंधळे हा परराज्यात असणार. ते कोकरू आहे, कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलीस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे असेही सुरेश धस यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group