बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला तसेच संपूर्ण राजकरण ढवळून निघाले आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जातो. तसेच विरोधकांकडून धनंजय मुंढे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी इतका मोठा मूक मोर्चा निघाला तरीही सरकार जागे झाले नाही. या प्रकारांची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, धनंजय मुंढे यांचा राजीनामा घ्यावा त्याशिवाय न्याय मिळणार नाही. संतोष देशमुख हत्याप्रकरणातीळ वाल्मिक कराड याला अजून अटक झालेली नाही. हे महाराष्ट्र विकून खातील तरीही कारवाई होणार नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आरोपीला अटक करू मकोका लावू असा घोषणा केल्या. तरीही आरोपीला अटक का होत नाही ? वाल्मिक कराड हा सरकरचा जावाई आहेका असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. असे विजय वडेट्टीवावर म्हणाले.
तसेच, "महाविकास आणि महायुतीमध्ये फरक आहे. हे महाराष्ट्र विकून खातील, तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही. महाराष्ट्रात खुलेआम महिलांचं शोषण होईल. खून करतील तरी कारवाई करणार नाहीत. चौकशी करतील. चित्रा ताई म्हणाल्या, मंत्री करु नये, तरी संजय राठोडांना मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणवरुन आरोप झाल्यानंतर आम्ही जरा सुद्धा वेळ घालवला नाही, लगेच काढून टाकलं. इकडे पाहा. प्रेम करणारी असूदेत..प्रेम करुन मारहाण करतात, सोडूनही देतात. तुमची परवानगी असेल तर 10-10 बायका करा, पण कोणाचा खून तरी करु नका", असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, संतोष देशमुख यांचं कुटूंब अजूनही रडतंय. महिलांच्या शोषनाच्याही अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने या संदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे. आकाच्या वर बाका आहे ते हे सर्व वाचवतोय. स्पेशल टीम लावली नाही. तुम्ही आरोपी शोधत नाही. मालमत्ता जप्त करत आहेत त्या खंडणी गोळा करुन जमा केल्या आहे. असेही ते यावेळी म्हणाले.