धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? ''या'' नेत्याने केले स्पष्ट
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? ''या'' नेत्याने केले स्पष्ट
img
दैनिक भ्रमर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर  देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आह. 

दरम्यान, आज पुन्हा एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता या प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघं मिळून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील असं गोगावले यांनी म्हटलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले गोगावले?

कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते, मर्यादा पार झाली की ती गोष्ट आपोआप घडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे बसून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group