मोठी अपडेट ! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ''त्या'' 2 आरोपींना वगळलं  ?
मोठी अपडेट ! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ''त्या'' 2 आरोपींना वगळलं ?
img
दैनिक भ्रमर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असून आता या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान आता या प्रकरणातील घडामोडींना वेग आला असून या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोन जणांना वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक हत्या तर दुसरा अॅट्रोसिटीच्या प्रकरणात आरोपी होता. पुरावे न सापडल्याने आरोपपत्रात नाव नाही. मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीने  आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणात धनंजच मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचा केलाय दावा केला आहे. आरोपपत्रात संतोष देशमुख हत्याकांडची सविस्तर माहिती आहे. सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांची नावे आरोपपत्रात टाकण्यात आलेली नाही. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा,असा मेसेज वाल्मिक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, असे आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय पुरता खोलात गेले आहे. पुरावे नसल्याने दोघांना या प्रकरणातून वगळले.

सीआयडीने संतोष देशमुख हत्या,दोन कोटीचे खंडणी प्रकरण आणि अट्रोसिटी अशा तीन प्रकरणाचा एकत्रित तपास करून दाखल केलंय आरोपपत्र दाखल केले आहे. सिद्धार्थ सोनावणे हा हत्येच्या आरोपातील आरोपी होता. तर रणजित मुळे हा अट्रोसिटीच्या प्रकरणात आरोपी होता. या दोघांनाही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्यामुळे आरोपपत्रात त्याचे नाव टाकण्यात आलेले नसल्याची माहिती

वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे आणि जयराम चाटे हे आरोपी अटक आहेत. तर,कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group