वाल्मिक कराडच्या गालावर वळ उठेपर्यंत मारहाण ? करूणा शर्मांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडच्या गालावर वळ उठेपर्यंत मारहाण ? करूणा शर्मांचा खळबळजनक दावा
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या प्रकरणात दार दिवशी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. दरम्यान आता  करुणा शर्मा यांनी  एक खळबळजनक दावा केला आहे. 

संरिश देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला कारागृहात मारहाण झाल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली. आता या प्रकरणात करूणा शर्मा यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्या गालावर वळ उमटले होते, असा दावा करुणा शर्मा यांनी केला. तसेच वाल्मिक कराडची पूर्ण दहशत संपली आहे, असेही त्या म्हणाल्या.

करूणा शर्मा म्हणाल्या, वाल्मिकची दहशत संपली आहे, जसं मला मारला होते, तशीच वाल्मिक कराड याला मारहाण जेलमध्ये करण्यात आल्याचे माझ्या सूत्रांनी सांगितले आहे. मी बीडमध्ये आल्यानंतर मी शपथ घेतली होती की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत संपवून टाकणार आहे. जेलमध्ये आठवलेने वाल्मिक कराडला जबर मारहाण केली. मी वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. त्याने 3200 लोकांना त्याने खोट्या केस मध्ये अडकवले आणि जेलमध्ये पाठवले आता त्याच जेलमध्ये त्याला ठेवले आहे.

वाल्मिकला भेटण्यासाठी आता परवानगी मागणार आहे आणि भेटीसाठी जेलमध्ये जाणार आहे.अजितदादानी अजून मंत्रीपद कोणाकडे दिले नाही. आज धनंजय मुंडे मंत्री नसेल तरी प्रशासन काही करत नाही. वाल्मीक कराड याला जेवण बाहेरून येते , झोपण्यासाठी खाटा देखील आहे जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे.  साठ वर्षाचा म्हातारा जेलमध्ये बसून दहशत पसरवत आहे.. प्रशासन नेमके काय करत आहे? असा सवाल देखील करूणा शर्मा यांनी केला.

वाल्मीक कराड याला जेलमध्ये जबर मारहाण झाल्याचे मला जेलमधील माझ्या सूत्रांनी सांगितले. माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे सीसीटीव्ही फुटेज काढा, सीसीटीव्हीमध्ये सर्व काही दिसेल. आता वाल्मीक कराडची दहशत संपली आहे, असे करूणा शर्मा म्हणाल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group