बीड : महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा दावा विजयसिंह बाळा बांगर यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , विजयसिंह बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीतेवर गंभीर आरोप केले.
बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात यापूर्वी धक्कादायक खुलासे करणारे वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गितेचा हात असून गोट्या गिते हा सायको किलर आहे. त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, असं विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.