धक्कादायक घटना : वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार ; नेमकं काय प्रकरण?
धक्कादायक घटना : वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
बीडमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाल्मीक कराडच्या समर्थकानेच हे भयंकर कृत्य केले आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बीडच्या केजमध्ये घडली. आरोपीने वाल्मीक कराडच्या सुटकेसाठी आंदोलन केले होते. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. वाल्मिक कराडचा समर्थक नानासाहेब चौरेने गावात राहणाऱ्या एका गतीमंद मुलीवर बलात्कार केला. आरोपीने बळजबरी बलात्कार करताना पिडीतेच्या नात्यातील एका महिलेने पाहिले आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीने हा प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला होता.

यानंतर या महिलेने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. पिडीतेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात नानासाहेब चौरेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रात्री पोलिसांनी अटक केली.

आरोपी नानासाहेब चौरे हा वाल्मीक कराडचा समर्थक आहे. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी आरोपीने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.

सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड कारागृहात आहे. वाल्मीक कराडच्या समर्थकाने हे घृणास्पद कृत्य केल्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group