मोठी बातमी ! संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी ! संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राजकारणासह संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी  कडून तपास सुरु आहे. याचदरम्यान आता याप्रकरणाची मोठी बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या आणि अवादा खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या  हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसाचे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपींना पुन्हा तपासासाठी पीसीआर देण्याच्या अटीवर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. कुठलाही तपासाचा नवीन मुद्दा उपस्थित झाला नाही. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने 14 दिवस लगेच मान्य केलं, अशी माहिती सरकारी तर, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर 20 जानेवारी रोजी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने वाढीव तारीख दिली . खंडणी प्रकरणात कराड व चाटे या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. कराडच्या वकिलांनी तारीख वाढवून घेतली.पक्षाचे वकिल बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.

आधीच 45 दिवस तपास केला आहे आणि नियमानुसार, आज पीसीआर देता आला नसता म्हणून सरकार पक्षाने एमसीआरची मागणी केली. त्यामुळे न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पुन्हा पीसीआर माहिती दिली तर आम्ही त्याला विरोध करू, अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील अनंत तिडके यांनी दिली. आरोपींना एकत्र ठेवणार की वेगवेगळे हा जेल प्रशासनाचा अधिकार आहे. मला आरोपींशी स्वतंत्र बोलण्याची संधी न्यायालयाने दिली, असंही तिडके म्हणाले.

दरम्यान, यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, या आरोपींचा समावेश आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group