आणखी एका 'वैष्णवी'चा मृत्यू! सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ ; विवाहितेनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं
आणखी एका 'वैष्णवी'चा मृत्यू! सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ ; विवाहितेनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं
img
Dipali Ghadwaje
बीडमध्ये एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तिने गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं विवाहितेच्या घरच्यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शुभांगी संतोष शिंदे असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. महिला आपल्या सासरच्या मंडळींसोबत अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात राहत होती. लग्नानंतर सासरच्यांकडून सतत हुंड्यासाठी छळ सुरू होता. चार लाख देऊनही आणखी २ लाख रूपयांची मागणी करत असल्याचा आरोप विवाहित महिलेच्या कुटुंबाने केला.

याच त्रासाला कंटाळून विवाहित महिलेनं गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनंतर शुभांगीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोपी माहेरच्या नातेवाईकांनी केला. या नंतर शुभांगी शिंदेंचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मात्र, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं शुभांगीच्या नातेवाईकांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस ठाण्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत असून न्याय मिळेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group