बीडच्या माजलगाव शहरात भाजप नेते बाबासाहेब आगे यांची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून धक्कादायक कारण समोर आले आहे.
अनैतिक संबंधातून भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बाबासाहेब आगे यांचे मेहुणे बबन प्रभू घाटूळ यांच्या फिर्यादीवरून माजलगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बीडच्या माजलगाव शहरामध्ये अनैतिक संबंधातून मधून भाजपा पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबासाहेब आगे यांच्यावर दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली.
बाबासाहेब आगे यांची हत्या करत असताना आरोपी नारायण शंकर फपाळ म्हणत होता की, 'माझ्या पत्नीसोबत मागील दहा वर्षापासून आहेस ना. तुला आज खल्लास करतो.' असे बोलून बाबासाहेब आगे यांच्यावरती कोयत्याच्या सहाय्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. बीडमध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये ही तिसरी हत्याकांडाची घटना आहे.
बाबासाहेब आगे यांच्या डोक्यावर, पाठीमागील बाजूस, मानेवर उजव्या बाजूला, कमरेवर उजव्या बाजूला तसेच डाव्या हाताचे मनगटावर खोलवर वार झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. शस्त्र अधिनियम 1959 अन्वये कलम 25 अधिनियम 1959 कलम चार आणि भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 103( 1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.